विद्यार्थ्यांनी केला दिघी टेकडी परिसर स्वच्छ!
शिक्षण विश्व: स्वच्छतेचा संदेश देत मास्टर माईंड ग्लोबल स्कूलचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी चिंचवड | महात्मा गांधी जयंतीनिमित्त मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, दिघी येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रदीपा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून दिघी टेकडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी घोषवाक्ये देत पोस्टर्सद्वारे जनजागृती केली.
हेही वाचा : चाकणमधील ‘‘ट्रॅक कॉम्पोनंट’’ च्या कामगारांना 14 हजारांची पगारवाढ!
“स्वच्छता ही सेवा आहे” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हेतू या उपक्रमामागे होता. गांधीजींच्या ‘स्वच्छ भारत’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत उदाहरण निर्माण केले.
या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणाविषयीची जाण वाढली असून, भविष्यात स्वच्छ आणि सुंदर परिसर राखण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प त्यांनी केला. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.




