Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हृदयद्रावक; चोविसावाडी लिफ्टमध्ये अडकून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

पिंपरी चिंचवड | चोविसावाडी येथील ११ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. ही घटना ऐन दसरा, विजयादशमीच्या दिवशी घडली आहे. अमेय फडतरे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय फडतरे हा अकरा वर्षीय मुलगा लिफ्ट सोबत खेळत होता. जिन्याने वर जाऊन लिफ्टने खाली यायचा. हे असंच काही मिनिट सुरू होत. याचा शेवट असा होईल असं कुणालाही वाटलं नाही. लिफ्टच्या दरवाजाच्या मधल्या जागेत अडकून अमेय गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात अडकलेल्या अमेयला अग्निशमनच्या जवानांनी तात्काळ येऊन काढलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, अमेयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनेमुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. दिघी पोलीस याबाबत तपास करत आहेत.

हेही वाचा    :    ‘आझाद काश्मीर..’; पाकिस्तानच्या माजी महिला कर्णधाराचं वादग्रस्त विधान 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button