Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

CM Devendra Fadnavis : मराठवाड्यासह पश्चिम विदर्भ आणि सोलापूर तसंच उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे या ठिकाणी पावसाचं जोरदार थैमान सुरु आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये अशी स्थिती आहे. मराठवाड्यात ओला दुष्काळसदृश परिस्थिती असल्यासारखा पाऊस दिवसरात्र कोसळतो आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच आठवड्यात मराठवाड्याचा दौरा केला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना अधिकारी वर्गाला केल्या आहेत.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे आठ जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्‍यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत. पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे. सर्व अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा –  राज्यात आजही धो धो पाऊस; मुंबई, अहिल्यानगर, पुणेसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावासाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी केली जात आहे. हेक्टरी ५० हजार रुपये इतकी मदत राज्य सरकारने करावी अशी मागणी उद्धव ठाकरे, जयंत पाटील, राज ठाकरे या सगळ्या नेत्यांनी केली आहे.

२७ तारखेला समोर आलेल्या माहितीनुसार माजलगाव धरणातून सिंदफणा नदी पात्रात धरणाचे ११ दरवाजे उघडत ४२००० प्रतिसेकंद घनफूट वेगाने विसर्ग केला जात आहे. केज मधील धनेगाव येथील मांजरा धरणाचे ६ दरवाजे उघडत नदीपात्रात २७१६६ प्रतिसेकंद घनफूट वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती इतर भागांमध्येही आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button