भारताची अग्नि प्राइम मिसाइलची यशस्वी चाचणी
भारताने असं मिसाइल बनवलं जे ट्रेनमधूनच उडवेल 2 हजार किमीपर्यंतच टार्गेट
राष्ट्रीय : भारत सतत आपली सैन्य शक्ती वाढवत आहे. नवरात्रौत्सव सुरु असताना सैन्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारताने गुरुवारी अग्नि प्राइम मिसाइलची यशस्वी चाचणी केली. ही टेस्ट रेल्वे आधारित मोबाइल लॉन्चर प्रणालीवरुन करण्यात आली. अग्नि प्राइम हे मध्यम पल्ल्याचं मिसाइल आहे. याची रेंज 2000 किलोमीटर आहे. DRDO ने ओदिशाच्या चांदीपूर येथील रेल्वे मोबाइल लॉन्चरवरुन हे क्षेपणास्त्र लॉन्च केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO ला शुभेच्छा दिल्या आहेत.
अग्नि प्राइम मिसाइल आता धावत्या ट्रेनमधून शत्रुवर हल्ला करण्यास सक्षम आहे. याची रेंज 2000 किलोमीटर आहे. नवरात्रौत्सवात सैन्याला एक नवीन शक्ती मिळाली आहे. हे क्षेपणास्त्र शत्रुवर काळ बनून तुटून पडेल. या क्षेपणास्त्रात अनेक Advance फिचर आहेत. हे मिसाइल लॉन्च करण्याची एक लेटेस्ट टेक्नीक आहे. अग्नि प्राइम ही भारताची सायलेंट स्ट्राइक मिसाइल आहे. शत्रुला इशारा दिल्याशिवाय लांबूनच हे मिसाइल विद्ध्वस घडवू शकतं. न्यूक्लियर वॉरहेड वाहून नेण्यासाठी हे मिसाइल डिझाईन करण्यात आलय. म्हणजे शत्रुवर याचा अजून विनाशकारी परिणाम होईल.
यामुळे शत्रुला कळणार सुद्धा नाही
अग्नि प्राइम मिसाइल कॅनिस्टरमध्ये ठेवलं जातं. कॅनिस्टर खूप मजबूत असतं. कॅनिस्टरमधू मिसाइल कुठल्याही मोठ्या तयारीशिवाय थेट डागता येतं. यावर वातावरणाचा कुठला विशेष परिणाम होत नाही. या मिसाइलला वारंवार देखभालीची गरजही पडत नाही. या नव्या टेक्नोलॉजीमुळे फायदा हा होईल की, रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून कमीत कमी वेळात ते लॉन्च करता येऊ शकतं. यामुळे शत्रुला कळणार सुद्धा नाही. भारताला तात्काळ उत्तर देता येईल.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
अग्नि-प्राइम मिसाइलची खासियत काय?
रेंज : 1000 ते 2000 किलोमीटर पर्यंत हल्ला करण्याची क्षमता.
कॅनिस्टराइज्ड मिसाइल : मिसाइल नेहमी कॅनिस्टरमध्ये (डब्ब्यासारख्या कंटेनर) ठेवली जाते. त्यामुळे तुम्ही सहजतेने ट्रान्सपोर्ट करु शकता आणि तात्काळ लॉन्च करता येईल.
डुअल स्टेज सॉलिड फ्यूल : यात दोन स्टेजच खास इंधन वापरलं जातं. यामुळे वेग आणि अचूकता दोन्ही वाढते.
रेल्वे आणि रोड वरुन करु शकता लॉन्च : आजची चाचणी पहिल्यांदा रेल्वे आधारित मोबाइल लॉन्चरवरुन झाली. कुठेही हे मिसाइल डागता येतं.
एडवांस्ड गाइडेंस सिस्टिम : यात अत्याधुनिक इनर्शियल नेविगेशन सिस्टिम आणि सॅटेलाइट गाइडेंस आहे. लक्ष्यावर अचूक वार करण्यास सक्षम आहे.
हलकं आणि कॉम्पॅक्ट : जुन्या अग्नि-1 आणि अग्नि-2 मिसाइल पेक्षा जास्त हलकं, आधुनिक आणि तांत्रिक दृष्टया अधिक उन्नत आहे.





