नवरात्रीपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता त्यांचं संबोधन होणार असून यावेळी ते कोणत्या विषयवर बोलतील याबाबत मात्र अस्पष्टता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान मोदी आज जीएसटीच्या दरांबाबत बोलण्याची शक्यता आहे. उद्यापासून म्हणजेच नवरात्रीपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. याविषयी ते देशाला संबोधित करतील अशी माहिती आहे.
याशिवाय पंतप्रधान मोदी मोठी घोषणा करतील अशी शक्यताही वर्तवली जाते आहे. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून बोलताना त्यांनी यंदाची दिवाळी देशवासियांसाठी ‘डबल गिफ्ट’ घेऊन येणारी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरकारने जीएसटीचे दर कमी केले. अशातच आता पंतप्रधान मोदी देशाला संबंधित करणार आहेत म्हटल्यावर त्यांच्याकडून मोठ्या घोषणेची शक्यता आहे. त्यामुळे आज डबल गिफ्ट देतात का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी अनेकदा देशाला संबोधित केलं आहे. २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईक, आणि २०१९ मध्ये झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईक नंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं होतं. त्यावेळी भारतीय सैन्याचं कौतुक करत त्यांचे अभिनंदत केलं होतं. तसेच त्यांनी देशवासियांना एकत्र राहण्याचं आवाहनही केलं होतं.
याशिवाय २०१६ मध्ये देशाला संबोधित करताना त्यांनी नोटीबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी ८ नोव्हेंबर पासून ५०० आणि १००० च्या नोटा बंद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच २०२० मध्ये करोना काळातही त्यांनी देशाला संबोधित केलं होतं. २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणाही त्यांनी देशाला संबोधित करतानाच केली होती.





