ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“भाषा ही संस्कृतीचा, परंपरांचा आत्मा आहे,” : इम्रान शेख

हिंदी भाषेचा गौरवशाली उत्सव : महात्मा फुले महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात

पिंपरी- चिंचवड : महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात आणि साहित्यिक वातावरणात साजरा करण्यात आला. “भाषा ही केवळ बोलण्याचे किंवा लिहिण्याचे साधन नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा आणि ओळखीचा आत्मा आहे,” असे मत युवक शहर अध्यक्ष व माजी विद्यार्थी इम्रान भाई शेख यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) कामायनी सुर्वे यांनी प्रास्ताविक करत हिंदी भाषेच्या गौरवशाली परंपरेवर प्रकाश टाकला.

समारंभाचे प्रमुख अतिथी स.प. महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख, साहित्यिक व अनुवादक प्रा. (डॉ.) गोरख थोरात होते. “हिंदीतील रोजगाराच्या संधी” या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत सांगितले की, “करण्यानेच होते, आधी करायला हवे.” त्यांनी हिंदीतील सरकारी व खासगी क्षेत्रातील करिअरच्या संधी स्पष्ट केल्या.

प्रसिद्ध समाजसेवक व माजी विद्यार्थी इम्रान शेख यांनी सोशल मीडियाच्या युगात हिंदी भाषेचा प्रभाव आणि तिचा बदलता चेहरा विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला. reels, cinema, YouTube यांसारख्या माध्यमातून हिंदी भाषेचा वाढता प्रभाव त्यांनी ठळक केला.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

यावेळी माजी विभाग प्रमुख प्रा. अलका चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना “कामाविषयी निष्ठा आणि जिद्द” या मूल्यांचे महत्त्व पटवून देत महाविद्यालयातील सुवर्णक्षणांची आठवण करून दिली.

कार्यक्रमात ‘आधुनिक हिंदी साहित्य में पर्यावरण चेतना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक डॉ. प्रमोद परदेशी, डॉ. वैशाली खेड़कर आणि डॉ. अलका घोडके यांनी संपादित केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. (डॉ.) पांडुरंग भोसले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या उदाहरणांद्वारे मोटिवेशन दिले.

हिंदी दिवसानिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :

काव्यवाचन स्पर्धा –
प्रथम : मुस्कान इब्राहिम गोलंदाज
द्वितीय : सुमय्या महेमूद सय्यद
तृतीय : श्रुती साईनाथ वाकडे

वक्तृत्व स्पर्धा –
प्रथम : मुस्कान इब्राहिम गोलंदाज
द्वितीय : पल्लवी राम लाड
तृतीय : साक्षी कालूराम मस्के
उत्तेजनार्थ : आशिक रविंद्र शिरसाट, संजोग सुरेश मस्के

निबंध स्पर्धा –
प्रथम : श्रावणी पांडुरंग फुलझळके
द्वितीय : अंकित लक्ष्मण मुजमुले
तृतीय : सुमैया महमूद सय्यद
उत्तेजनार्थ : शिवानी संगम तिवारी

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन विद्यार्थिनी सुमय्या सय्यद हिने केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मंगेश वाडेकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात आणि हिंदी भाषेबद्दल आत्मीयतेने पार पडला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button