ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून हिंदी भाषेच्या सौंदर्याची प्रचीती
शिक्षण विश्व : विद्या व्हॅली नॉर्थ पॉइंट स्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड : विद्या व्हॅली नॉर्थ पॉइंट स्कूलमध्ये हिंदी दिन अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. प्री-प्रायमरीपासून ते उच्च वर्गांपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध रंगीबेरंगी कार्यक्रम सादर करून आपली प्रतिभा उजागर केली.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी भावस्पर्शी गीते, कवितांचे सादरीकरण, तसेच कबीर यांचे दोहे सादर करत हिंदी भाषेच्या सौंदर्याची प्रचीती उपस्थितांना दिली. विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगत भाषेप्रती आदर आणि आत्मीयता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण भाषांतराद्वारे आपल्या भाषिक कौशल्याचाही परिचय दिला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन हिंदी विषयाच्या शिक्षिका वर्षा धावडे यांनी केले.




