ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

व्हायरल केलेला व्हिडिओ तरुणाच्या अंगलट!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे तरुणाला अटक

पिंपरी चिंचवड : सोशल मीडियावर पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. २७) जुनी सांगवीतील औंध जिल्हा आयुष रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीजवळ घडली.

ओम उर्फ नन्या विनायक गायकवाड (वय २१, रा. जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आशिष वाघमारे (नवी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आकाश खंडागळे यांनी गुरुवारी (दि. २८) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओम गायकवाडच्या हातात पिस्तूल असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

हेही वाचा      :          ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने तो व्हिडिओ स्वतःचा असल्याचे कबूल केले. व्हिडिओमधील पिस्तूल त्याचा मित्र आशिष वाघमारे याचे असून, पोलिसांनी पकडण्याच्या भीतीने त्याने ते पिस्तूल ओमकडे लपवण्यासाठी दिले होते. पोलिसांनी ओमने लपवून ठेवलेले ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button