Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

परप्रांतीयाकडून थेट राज ठाकरेंना शिवीगाळ!

मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पसरला

मुंबई : अंधेरी परिसरात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीय तरुणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे, ज्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुजित दुबे असे या तरुणाचे नाव असून, त्याने शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना अंधेरी पूर्वेतील महाकाली रोडजवळील सुंदरनगर भागात घडली. व्हिडीओत सुजित दुबे दारूच्या नशेत राज ठाकरे यांना आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. या प्रकारामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा      :        कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांची प्रेरणा; शिवशंभो प्रतिष्ठानला “मोरया पुरस्कार” द्वितीय क्रमांकाने सन्मान

शिवाय, सुजित दुबे याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या तीन अनधिकृत धंद्यांवर तातडीने बंदी घालण्याची मागणीही मनसेने केली आहे. जर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई झाली नाही, तर पोलिस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button