न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
शिक्षण विश्व: विविध कला गुणदर्शनाच्या कार्यक्रमातून स्वातंत्र्याचे गौरव गान

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, थेरगाव येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अतिशय उत्साहात व गौरवशाली वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या आवारात देशभक्तीचा माहोल निर्माण झाला होता, आणि शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. संस्थेचे अध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष निलेश पलघुमल, सचिव अशोक मोरे, खजिनदार सुरेखा पवार, नयना माने, विलास शेलार, रमेश पाटील, विनायक पवार, संध्या पवार, महादेव जमादार, शशिकांत इंगवले उपस्थित होते.
हेही वाचा : गोपाळकाला आणि दहीहंडीच्या उत्सवात विद्यार्थी झाले चिंब!
ध्वजारोहणानंतर शाळेतील ८वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर करत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. यानंतर शाळेच्या प्रायमरी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी नृत्य, भाषणं, समूहगीत, देशभक्तिपर गीतं अशा विविध कार्यक्रमांद्वारे आपले कलागुण सादर केले.
विद्यार्थ्यांनी देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचे संदेश देणाऱ्या कार्यक्रमांमधून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रगीताचे सादरीकरण रूपाली माने व विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.




