गणेशोत्सवापूर्वी कासारवाडीतील घाटाची स्वच्छता करा
जनसंवाद सभा; घाट स्वच्छतेपासून ड्रेनेज समस्येपर्यंत चर्चा

पिंपरी | गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कासारवाडीतील घाट परिसर स्वच्छ ठेवण्यासह मूर्ती विसर्जनाच्या नियोजनावर योग्य कारवाई करण्याची मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभेत करण्यात आली. घाट स्वच्छते पासून येथील ड्रेनेज समस्येची गंभीर दखल घ्यावी अशी देखील मागणी नागरिकांनी केली. यावेळी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
गणपती आगमनापूर्वी घाट परिसरातील स्वच्छता, मूर्ती विसर्जनासाठी योग्य व्यवस्था, आणि मयत व्यक्तींच्या विसाव्याच्या जागेबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांवर लवकरच ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : भगवा दहशतवाद संबोधन हे काँग्रेसचे षडयंत्र; समीर कुलकर्णी
दरम्यान, कासारवाडी रेल्वे गेटजवळील परिसरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. संबंधित समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करायला अशी मागणी कासरवाडीतील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जवळकर यांनी केली होती.
या जनसंवाद सभेमुळे नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना दिशा मिळाली असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचे नक्कीच चांगली कामे होऊ शकतात असे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जवळकर यांनी सांगितले.





