पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राहुल गांधी पिछाडीवर, नरेंद्र मोदींनाच लोकांची पसंती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Narendra-modi-rahul-gandhi-1-1-1.jpg)
पंतप्रधान पदासाठी अद्यापही नरेंद्र मोदींनाच सर्वात जास्त पसंती असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अद्याप पिछाडीवर असल्याचं एका सर्व्हैतून समोर आलं आहे. पॉलिटिकल स्टॉक एक्स्चेंजने हा सर्व्है केला आहे. दक्षिण भारत वगळता इतर सर्व ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पसंती दर्शवण्यात आली आहे. पंतप्रधान पदासाठी अद्यापही नरेंद्र मोदींनाच सर्वात जास्त पसंती असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अद्याप पिछाडीवर असल्याचं एका सर्व्हैतून समोर आलं आहे. पॉलिटिकल स्टॉक एक्स्चेंजने हा सर्व्है केला आहे. दक्षिण भारत वगळता इतर सर्व ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पसंती दर्शवण्यात आली आहे.
सर्व्हैदरम्यान, 46 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत दिलं असून दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर 32 टक्के लोकांनी राहुल गांधींना मत दिलं आहे. 22 टक्के लोकांनी काहीच सांगू शकत नसल्याचं म्हटलं आहे. 25 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर दरम्यान हा सर्व्है करण्यात आला असून यामध्ये जवळपास दोन लाख लोकांनी सहभाग घेतला.
सर्व्हैनुसार, उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतात राहुल गांधींच्या तुलनेत नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलं. मात्र दक्षिण भारतात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर मात केली असून तिथे त्यांची लोकप्रियता वाढली असल्याचं पॉलिटिकल स्टॉक एक्स्चेंजने म्हटलं आहे.
उत्तर भारतात नरेंद्र मोदींना 45 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला असून, राहुल गांधींना 27 टक्के मतं आहेत. पूर्व भारतात मोदींना 50 तर राहुल गांधींना 25 टक्के मतं मिळाली आहेत. पश्चिमेत हा आकडा 52 आणि 33 टक्के आहे.
दक्षिण भारतात मात्र लोकांनी मोदींच्या तुलनेत राहुल गांधींना पसंती दर्शवली आहे. पंतप्रधान कोण व्हावं या प्रश्नावर उत्तर देताना 40 टक्के लोकांनी राहुल गांधींना मत दिलं असून, 37 टक्के लोकांनी मोदींना मत दिलं आहे.