दिल्लीच्या संसद भवनात ‘जय महाराष्ट्र’चा नारा; मराठी खासदारांनी निशिकांत दुबे यांना विचारला जाब

दिल्लीच्या संसद भवनात ‘जय महाराष्ट्र’चा नारा; मराठी खासदारांनी निशिकांत दुबे यांना विचारला जाब

नवी दिल्ली : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद आता संसदेतही उमटले आहेत. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून संसद भवनाच्या लॉबीत त्यांना मराठी खासदारांनी जाब विचारला. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांच्यासह इतर खासदारांनी दुबे यांना घेरत संतप्त प्रतिक्रीया दिली.

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, “संसदेच्या लॉबीत आम्ही दुबे यांना थांबवले. त्यांच्या विधानावर उत्तर मागितले. तुम्ही कोणाला आपटून आपटून मारणार आहात, असा सवाल आम्ही केला. आमचा रोख पाहून त्यांनी नाही, नाही, असं काही नाही म्हणत ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिला आणि तिथून निघून गेले.”

हेही वाचा –  दौंड कला केंद्र गोळीबार प्रकरणी आमदाराच्या भावाला अटक

ही घटना संसद लॉबीतील कॅन्टीनजवळ घडली. दुपारी सुमारे १२.३० ते १ च्या दरम्यान महाराष्ट्रातील महिला खासदार दुबे यांना शोधत होते. त्या वेळी भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांना दुबे यांची चौकशी करताना पाहण्यात आले. त्याचवेळी दुबे समोर येताच मराठी महिला खासदारांनी त्यांना रोखून थेट सवाल केले.

या प्रसंगावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, “दुबे यांना अडवले, जाब विचारला. हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राची बदनामी सहन केली जाणार नाही. तुम्ही काय केले हे स्पष्ट पाहायला मिळाले.” मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील या घटनेचे समर्थन करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे कौतुक केले. “पक्षभेद विसरून मराठी म्हणून एकत्र येण्याची ही वेळ आहे,” असं ते म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *