Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

आत्मविश्वास ठेवाल तर यश नक्की मिळेल : डॉ. दीपक शहा

प्रतिभा महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम उत्साहात

पिंपरी-चिंचवड : कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा महाविद्यालयात विविध शाखांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांसाठी ‘इंडक्शन प्रोग्राम २०२५’ चे आयोजन उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी विद्यार्थ्यांना “आत्मविश्वास जागृत ठेवाल, तर यश तुमचं नक्कीच आहे” असे मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दीपक शहा हे होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर संचालिका डॉ. तेजल शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, विभागप्रमुख डॉ. जयश्री मुळे, डॉ. अनामिका घोष, डॉ. हर्षिता वाच्छानी, प्रा. हेमलता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, प्रश्नमंजुषा, विविध गुणदर्शन, सायबर सिक्युरिटी व जनजागृती यासारख्या विविध विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. महाविद्यालयातील संस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण समिती आणि क्रीडा विभागाच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा – संत साई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मन:शक्ती प्रणीत ‘होमहवन’ उत्साहात

शिस्तीची शपथ व मिस्टर-मिस फ्रेशरचा गौरव

मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिस्तीची शपथ दिली. यावेळी ‘मिस्टर व मिस फ्रेशर’ स्पर्धेत क्षितिज रणसिंग (एफ.वाय. बी.कॉम. बी.एम.) व सानिया यादव (एफ.वाय. बी.एस्सी. ए.आय.) यांनी विजेतेपद पटकावले. त्यांच्या सन्मानाचा गौरव डॉ. क्षितिजा गांधी व डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. हनुमंत कोळी, डॉ. रूपा शहा, डॉ. अनामिका घोष, डॉ. दिनेश लाहोरी यांनी केले.

प्रेरणादायी मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना डॉ. दीपक शहा म्हणाले की, “परीक्षेतील गुण जितके महत्त्वाचे, तितकेच तुमचे व्यक्तिमत्त्व आणि कलागुणही महत्त्वाचे आहेत. ध्येय ठरवा आणि त्यासाठी दिवस-रात्र मेहनत करा. या तीन वर्षात मिळणारे संस्कार तुमच्या आयुष्याचा मजबूत पाया घालतील.” त्यांनी उत्तम संगती, वाचन आणि आत्मचिंतनाच्या महत्त्वावरही भर दिला.

प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी आणि डॉ. राजेंद्र कांकरिया यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नेहा जैन यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जयश्री मुळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी डॉ. आनंद लुंकड, प्रा. रोहित अकोलकर, प्रा. ज्योती इंगळे, प्रा. कानंन पडते, प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. सुप्रिया गायकवाड, संदीप शहा आदींनी विशेष परिश्रम घेतले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button