Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

ChatGPT आणि OpenAI सेवांमध्ये मोठी अडचण; जगभरातील युजर्सना अडथळे, कंपनीकडून स्पष्टीकरण

मुंबई : जगभरातील वापरकर्त्यांना OpenAI च्या ChatGPT, Sora आणि GPT API सारख्या सेवांचा वापर करताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच युजर्सनी या चॅटबॉटच्या डाउनटाइमबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या, आणि आता पुन्हा एकदा मोठा आउटेज अनुभवला जात आहे. भारतासह अमेरिका, युरोप आणि आशिया खंडांतील हजारो वापरकर्त्यांना ChatGPT काम करत नसल्याचा त्रास होत आहे.

‘DownDetector’ या तांत्रिक अडचणी नोंदवणाऱ्या वेबसाइटनुसार, या बातमीच्या वेळेपर्यंत **3,400 हून अधिक युजर्सनी ChatGPT च्या आउटेजची तक्रार नोंदवली आहे**. यामध्ये प्रमुख समस्या म्हणून लॉगिन करता न येणे, उत्तर मिळण्यात अडथळे येणे, GPT API अ‍ॅक्सेस अयशस्वी होणे अशा बाबी समोर आल्या आहेत. OpenAI चे नवीन टूल ‘Sora’ सुद्धा या तांत्रिक अडचणींमुळे सध्या वापरात आणता येत नाहीये.

ChatGPT आणि अन्य सेवांच्या तांत्रिक बिघाडावर OpenAI ने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, **समस्येचे कारण शोधण्यात आले असून सध्या त्यावर काम सुरू आहे**. लवकरच सेवा पूर्ववत करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. मात्र, सतत येणाऱ्या या अडचणींमुळे युजर्समध्ये नाराजी आणि अस्वस्थता आहे.

विशेष म्हणजे, ही समस्या चालू महिन्यातील दुसरी मोठी अडचण आहे. त्यामुळे OpenAI च्या सेवा स्थिरतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. व्यवसायिक ग्राहक आणि रोजच्या कामासाठी AI टूल्सवर अवलंबून असलेले वापरकर्ते विशेषतः या अडचणीमुळे त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा – बाजार समित्यांना राष्ट्रीय कक्षेत आणणार; कायद्यात आवश्‍यक सुधारणा करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

OpenAI कडून युजर्ससाठी महत्त्वाचे निर्देश

-OpenAI ने युजर्सना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत:

-वारंवार लॉगिन करण्याचे टाळा, अन्यथा अकाउंटवर सिक्युरिटी लॉक लागू होऊ शकतो.

-रिअल-टाइम अपडेट्ससाठी फक्त अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा.

– समस्या सुटेपर्यंत ChatGPT वापरून महत्त्वाचा डेटा स्टोअर करू नये, अन्यथा काही परिस्थितीत डेटा डिलीट होण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group