Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी महापालिका राबवणार व्यापक मोहीम

दिव्यांग व्यक्तींना सेवा अधिक सक्षमपणे देण्यासाठी ठरणार उपयुक्त

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दिव्यांग नागरिकांची अचूक नोंद घेण्यासाठी व्यापक सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींची नेमकी संख्या, त्यांच्या अडचणी, गरजा आणि लाभार्थी योजना यांचा आढावा घेऊन अधिक प्रभावी नियोजन आणि सेवा देणे यासाठी हे सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

दिव्यांग हक्क कायदा २०१६ नुसार केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने स्थानिक स्तरावर दर ५ वर्षांनी दिव्यांगांचा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. २०१६ च्या कायद्याच्या अगोदर फक्त ७ प्रकारचे दिव्यांगत्व दृष्टिक्षेपात घेतलेले आहेत. परंतु सद्य परिस्थितीमध्ये २०१६ च्या कायद्यानुसार २१ प्रकारचे दिव्यांगत्व निदर्शनास आणलेले आहेत. तसेच राज्य शासनाने १६ मार्च २०२४ रोजी यासंबंधी शासननिर्णय देखील काढलेला आहे. यामध्ये दिव्यांगांचे कशा प्रकारे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे, यासाठी एसओपी व प्लॅन दिलेला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने या सर्वेक्षणाचा प्लान केला आहे. या सर्वेक्षणात शहरातील सर्व घरांचे सर्वेक्षण करून दिव्यांगांविषयी सखोल माहिती गोळा केली जाणार आहे.

गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केलेले ‘दिव्यांग भवन’ हे महाराष्ट्रातील पहिलेवहिले असे केंद्र आहे, जे दिव्यांगांसाठी पुनर्वसन, थेरपी, सहाय्यक सेवा, कौशल्यविकास आणि सक्षमीकरणासाठी एकाच छताखाली सेवा देत आहे. हे नवीन सर्वेक्षण ‘दिव्यांग भवन’साठी नियोजन व सेवा पुरवठा अधिक प्रभावी बनवण्यासाठी आधारभूत ठरणार आहे.

हेही वाचा      :      रिक्षाचालकाची दोन्ही मुले झाली ‘सीए’

या सर्वेक्षणाचे उद्दिष्टे

दिव्यांग नागरिकांच्या दिव्यांगत्वाचे प्रकार जाणून घेणे आणि ते घेत असलेल्या योजना आणि सेवांची माहिती संग्रहित करणे.दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीची सामाजिक-आर्थिक स्थितीस समजून घेणे.दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींमधील कौशल्य आणि रोजगार कौशल्यातील तफावत समजून घेणे. नवजात अर्भक आणि अर्भकांमध्ये दिव्यांगत्व आढळल्यास पालकांना उपचारांसाठी संदर्भित माहिती प्रदान करणे.

ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सर्वेक्षण

दिव्यांग व्यक्तींचा सर्वेक्षण करण्यासाठी महिला बचत गट, आशा सेविका आणि दिव्यांग बांधवांची मदत घेण्यात येणार आहे. हा सर्वेक्षण ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन माहिती संकलित करण्यासाठी ॲप देखील तयार करण्यात येणार आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी प्रभावी योजना राबवण्यासाठी आधी त्यांची अचूक माहिती संकलित असणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्वेक्षणातून प्राप्त माहितीवर आधारित शहरातील दिव्यांगांसाठी सुविधा आणि योजना अधिक सक्षम करता येणार आहेत.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना सामाजिक-आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी हे सर्वेक्षण खूपच उपयुक्त ठरणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या तसेच महापालिकेच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजना जास्तीतजास्त दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सर्वेक्षणामुळे मदत होईल.

– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group