Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Tesla Showroom | मुंबईत भारतातील पहिलं टेस्ला शोरूम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई | भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठत, जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने आपल्या भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन आज मुंबईत केले. वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये सुरू झालेल्या या शोरूमचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

मुंबईत केवळ शोरूमच नव्हे, तर पूर्ण इको-सिस्टिम

टेस्लाने केवळ शोरूमच सुरु केले नसून, यामध्ये ग्राहकांसाठी एक्स्पिरियन्स सेंटर, डिलिव्हरी, लॉजिस्टिक्स आणि सर्व्हिसिंगची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून भारत टेस्लाच्या आगमनाची वाट पाहत होता. आज महाराष्ट्रातून या प्रवासाची सुरुवात होत आहे, ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्र हे ईव्ही क्षेत्रात अग्रेसर असून, भविष्यात टेस्लाचे पूर्ण इको-सिस्टिम येथे उभे राहील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”

मॉडेल-Y कार भारतात उपलब्ध; किंमती 60 लाखांपासून सुरू

टेस्लाची प्रसिद्ध Model Y ही इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही मुंबई शोरूममध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या मॉडेलची सुरुवातीची किंमत ₹59.89 लाख असून, ऑन रोड किंमत सुमारे ₹61.7 लाख इतकी असण्याची शक्यता आहे. लाँग रेंज रिअर-व्हिल ड्राइव्ह व्हेरिएंटसाठी ही किंमत ₹71.02 लाखांपर्यंत जाऊ शकते.

India's first Tesla showroom in Mumbai; inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis

हेही वाचा     :      ”महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही..”; नितीन गडकरींचं वक्तव्य 

भारतात इंपोर्ट ड्यूटीमुळे किंमती वाढल्या

सध्या भारतात टेस्लाची वाहने अमेरिकेतील आणि चीनमधून आयात केली जात आहेत. त्यामुळे जवळपास 70% पर्यंत आयात शुल्क व कर आकारले जात आहेत. यामुळेच भारतीय ग्राहकांना कारच्या मूळ किमतीपेक्षा तब्बल 20 ते 25 लाख रुपये अधिक मोजावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांनी भारतातील आयात कर रचनेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

EV मार्केटमध्ये भारताचा वेग वाढतोय

भारत हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऑटोमोबाईल मार्केट असून, ईव्ही वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जून महिन्यातच भारतात 13,000 हून अधिक ईव्ही कार्सची विक्री झाली आहे. EV सेगमेंटमध्ये भारताचे वाढते योगदान लक्षात घेता टेस्लासारख्या जागतिक ब्रँड्सचा भारतात प्रवेश निश्चितच मोठा पाऊल आहे.

टेस्लाचे आगमन म्हणजे केवळ कार विक्री नव्हे, तर तंत्रज्ञान व रोजगाराचाही नव्हा अध्याय

टेस्लाच्या आगमनामुळे महाराष्ट्रात केवळ प्रगत इलेक्ट्रिक वाहने येणार नाहीत, तर नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी आणि रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group