राऊत-विरुद्ध शिरसाट वाद आता कोर्टात; शिरसाटांनी राऊतांविरोधात ठोकला अब्रू नुकसानीचा दावा

मुंबई : राज्यात संजय शिरसाट विरुद्ध संजय राऊत या नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिरसाट यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. माझा व्हिडीओ मार्फ करुन बनवला आहे असे शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच, राऊतांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असून त्या नोटीसला उत्तर दिले नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा शिरसाटांनी दिला आहे.
शिरसाट यांचा एका रुममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शिरसाट बेडवर बसले असून हातात सिगारेट आणि शेजारी पैशांनी भरलेली बॅग होती. व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी राऊत यांनी यासंदर्भात दावा केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात राऊतांचा दावा खरा ठरला अशी चर्चा रंगली. दरम्यान, शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना हा व्हिडीओ माझ्या घरातील रुममधील आहे. तसेच त्या बॅगेत पैसे नसून कपडे आहेत. असा दावा केला होता. मात्र, आता त्यांनी मला बदनाम करण्यासाठी मॉर्फ व्हिडीओ वापरल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा – जगातील सर्वात फास्ट बॅगेज क्लेम व्यवस्था; नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार? काय असणार खासियत
मला बदनाम करण्यासाठी हा मार्फ व्हिडीओ वापरण्यात आला आहे. मी ठरवलंय की, अशा लोकांना धडा शिकवायला हवा. स्वप्ना पाटकरबाबा त्यांचे व्हिडीओ पाहा मग तुम्हाला कळेल ते कसे आहेत. माझा तो व्हिडीओ हे माझ चारित्र्यहनन आहे. मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर गुन्हा दाखल करेन असा असा इशारा त्यांनी राऊतांना दिला आहे.




