म्हणून आयुषमानच्या पत्नीसाठी यंदाचा करवाचौथ होता खास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/ayushman.jpg)
पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक सौभाग्यवती वटपौर्णिमा किंवा करवाचौथचं व्रत करत असते. बॉलिवूडमध्ये करवाचौथच्या दिवसाचं विशेष महत्व असतं. बॉलिवूडमधील अनेक कलाकार हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नुकतंच विराट आणि अनुष्काने त्यांचा पहिला करवाचौथ सेलिब्रेट केला. त्यातच यावेळी अभिनेता आयुषमान खुरानानेदेखील त्याच्या पत्नीसाठी करवाचौथचा उपवास केल्याचं समोर आलं आहे.
गेल्या काही दिवसापासून आयुषमानची पत्नी ताहिरा कश्यप ही आजारी असल्यामुळे ती यंदा करवाचौथचा उपवास करु शकली नाही. त्यामुळे केवळ ताहिराच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी यावेळी आयुषमानने उपवास केला होता.आयुषमानने ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
आयुषमानने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला त्याच्या हातावर मेहेंदीने ‘त’ लिहिलेला दिसत आहे. ‘त’ म्हणजेच ताहिरा असे देखील त्या फोटोसोबत त्याने लिहिले आहे. दरम्यान, ताहिरा कश्यपला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून यावर ती उपचार घेत आहे. ताहिरानेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली होती.