मुंबई इंडियन्सच्या संघात एका नव्या खेळाडूची एन्ट्री
भारताची १९ वर्षीय वर्ल्ड कप विजेती परूणिका सिसोदीयाला मुंबई इंडियन्स संघात सामिल
![Mumbai, Indians, teams, new, players, entries,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/woman-780x470.jpg)
मुंबई : वूमेन्स प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला १४ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून सुरूवात होणार आहे. अशात शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सच्या संघात एका नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. भारताची १९ वर्षीय वर्ल्ड कप विजेती खेळाडू परूणिका सिसोदीयाला मुंबई इंडियन्स संघात सामिल केले आहे. फिरकीपटू परूणिका सिसोदीयाने १९ वर्षाखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. पूजा वस्राकर दुखापतग्रस्त असल्यामुळे परूणिकाला मुंबई इंडियन्स WPL 2025 हंगामासाठी करराबद्ध केले आहे.
१९ वर्षीय उदयोन्मुख खेळाडूने नुकत्याच झालेल्या १९ वर्षाखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने इंग्लंडविरूद्ध सेमिफायनलच्या सामन्यात २१ धावांत ३ विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरी केली. या सामन्यात तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा : अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन
परूणिका याआधी गुजरात टायटन्स संघाचा भाग होती. पण या हंगामात ती कर्णधार हरमप्रीत कौरच्या नेतृ्त्वात मुंबई इंडियन्स संघाचा भाग असणार आहे. मुंबईने वूमेन्स प्रिमिअर लिगच्या पहिल्या हंगामात विजेतेपद पटकावले होते. या हंगामात मुंबईचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध १५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथे खेळवण्यात येणार आहे.
वडोदरा, बंगळूरू, लखनौ व मुंबई या ४ ठिकाणी वूमेन्स प्रिमिअर लीगचे सामने खेळवण्यात येणार आहेत. १३ मार्च रोजी सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येईल. तर अंतिम सामना १५ मार्चला होईल.
मुंबई इंडियन्सने २०२५ च्या WPL लिलावात २ कोटी २० लाख रूपयात ४ खेळाडूंना संघात सामील करून घेतले. ज्यामध्ये सर्वाधिक १ कोटी ६० लाख रूपये तमीळनाडूच्या १६ वर्षीय जी कामालिनी हिच्यावर खर्च केले. त्याचबरोबर नदिन डी क्लर्क ( ३० लाख), अक्षिता माहेश्वरी (२० लाख) व संस्कृती गुप्ता (१० लाख) या तीन खेळाडूंना करारबद्ध केले.
मुंबई इंडियन्स
हरमनप्रीत कौर ( कर्णधार ), यास्तिका भाटिया, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, जिंतीमनी कलिता, नॅट स्क्रिव्हर-ब्रंट, परूणिका सिसोदीया, सजीवन सजना, शबनीम इस्माईल, सायका इशाक, अमनजोत कौर, अमनदीप कौर, कीर्तना, जी कामालिनी, नदिन डी क्लर्क, अक्षिता माहेश्वरी, संस्कृती गुप्ता.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा