ताज्या घडामोडी

पेट्रोल-डिझेल खराब होते का? जाणून घ्या किती दिवसांत इंधन खराब होतं?

Petrol Diesel ExPiry | दुकानातून एखादे समान खरेदी करताना स्पेशली फूड प्रोडक्ट घेताना आपण त्याची एक्सपायरी डेट बघतो. औषध घेताना तर ती तारीख पाहूनच औषधे घेतली जातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? की, आपली गाडी ज्या इंधनावर चालते. ते इंधन म्हणजे पेट्रोल कधी एक्सपायर होते?, त्याला अंतिम तारीख असते का? चला आज याबद्दल जाणून घेऊयात.

नेमके हे प्रकरण आहे तरी काय?

पेट्रोल किंवा डिझेल एखाद्या सीलबंद कंटेनरमध्ये भरून २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवल्यास ते सहा महिने ते एक वर्ष टिकू शकतं. परंतु, तेच पेट्रोल वाहनाच्या टाकीत भरलेलं असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन महिने इतकंच असतं.

हेही वाचा  :  ‘धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते’; मनोज जरांगे पाटील

तर इंधन सीलबंद कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं असेल आणि बाहेरचं तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन महिने इतकंच असतं. तसेच इंधन हे वाहनाच्या टाकीत भरून ठेवलेलं असेल आणि आसपासचं तापमान हे ३० अंश किंवा त्याहून अधिक असेल तर त्या इंधनाचं आयुष्य एका महिन्याहून कमी असतं.

दरम्यान, भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं. या केमिकल आणि इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलचं आयुष्य कमी होतं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button