Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा, हरवलेला आयफोन मोबाईलधारकाला परत दिला!

ह-क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचारी; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वल्लभनगर गोल मंडई येथे साफसफाई करताना
पालिकेच्या कर्मचाऱ्याला नवाकोरा आयफोन सापडला. मात्र त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा फोन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सुपूर्त केला. या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला.

ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत काम करणारे सफाई कर्मचारी सागर डावकर यांना नवीन आयफोन सापडला. त्यांनी तात्काळ आरोग्य विभाग अधिकारी व ॲड. सागर चरण युवा मंच यांच्याशी संपर्क साधून सर्व घटना सांगितली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल शेटे यांना ॲड. सागर चरण यांना घटनेची कल्पना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पोलीस निरीक्षक शशिकांत गाडेकर यांच्या मदतीने हरवलेल्या फोनचे मालक हरीश अमृतकर यांच्याशी संपर्क साधून त्यांचा हरवलेला आयफोन त्यांना परत करण्यात आला.

हेही वाचा  :  PCMC | पथनाट्यातून ओला-सुका कचरा विलगीकरणाचा संदेश!

सफाई कर्मचारी डावकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक पोलीस व ॲड. सागर चरण युवा मंच यांच्या मार्फत करण्यात आले.यावेळी, संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष ॲड. सागर चरण, अनुसूचित जाती जमाती आणि पिछड़ावर्ग संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजीमुद्दीन अन्सारी, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत गाडेकर, सामाजिक कार्यकर्ता विजय वांजळे आदि उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य वेळेत आणि प्रामाणिकपणे पार पाडले तर हरवलेली मालमत्ता संबंधित मालकास त्वरित परत मिळण्यास मदत होईल.

– ॲड. सागर चरण, माजी अध्यक्ष, आरोग्य विभाग तक्रार निवारण समिती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button