ताज्या घडामोडी

रेल्वेच्या ओव्हर हेड वायरला पकडल्याने एकाचा मृत्यू

पुणे : रेल्वे ट्रॅकवरील विद्युत खांबावर चढून एकाने रेल्वेच्या ओव्हर हेड वायरला स्पर्श केला. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२३ जानेवारी) पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

हेही वाचा  : सुजाण नागरिक होण्याकरता भूगोलाची जाण आवश्यक; डॉ. विजय खरे

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने विद्युत खांबावर चढून ओव्हरहेड वायर पकडली. शॉक लागून व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. त्याच्या उजव्या हातावर आणि दंडावर साप व त्रिशूल आणि डाव्या पंजावर इंग्रजी व्ही हे अक्षर गोंदलेले आहे. अंगार क्रीम कलरची पॅन्ट आणि काळ्या रंगाचा बूट घातला आहे. इतर कपडे आणि त्वचा जळाल्याने ओळख पटू शकली नाही. वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास रेल्वे पोलीस दिनेश बोरनारे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button