Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्ण संख्येत वाढ; 22 संशयित रुग्ण आढळल्याची माहिती

पुणेः गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील एका ६५ वर्षीय महिलेला हाता पायात झिणझिण्या आणि स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवत होता. या महिलेला साधी हालचाल करणे देखील अवघड बनले होते. अखेर तपासणीत तिला गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले. यानंतर डॅाक्टरांच्या पथकाने या महिलेवर उपचाराला सुरुवात केली आणि यानंतर या विकारावर महिलेने देखील यशस्वी मात केली आहे. मात्र, पुन्हा एकदा या दुर्मिळ आजाराचे तब्बल २२ संशयित रुग्ण पुणे शहरात आढळून आल्याची माहिती मिळत आहे.

या सर्व संशयित रुग्णांचे नमुने आयसीएमआरला पाठवण्यात आले आहेत. तिथून तपासणी झाल्यानंतर या आजाराचा निष्कर्ष निघणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दोन रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात काही रुग्णांना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जीबीएस या दुर्मिळ आजाराची काही प्रकरण पुणे महानगरपालिकडे नोंदण्यात आली आहेत. खरंतर हा आजार १ लाख लोकांमागे एका व्यक्तीला होतो. या आजाराचे रुग्ण बरे होत असले तरी २० टक्के रुग्णांना सहा महिन्यांनतही हालचालींमध्ये अडचणी येतात, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस लाचार, हतबल मुख्यमंत्री’; संजय राऊतांची खोचक टीका

महापालिकेकडून टीम तयार

शहरातील ज्या भागातून या रुग्णांची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे, त्या भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक टीम या भागात महापालिकेकडून पाठण्यात आली आहे.

गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे नेमकं काय?

या आजाराला शॅार्ट फॅार्ममध्ये जीबीएस असे म्हटले जाते.

हा आजार अत्यंत दुर्मिळ असून १ लाखांमागे एका व्यक्तीला या आजाराचे लागण होते.

हा आजार झाल्यानंतर प्रामुख्याने हातापायांना मुंग्या येतात. अशक्तपणा जाणवतो.

गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराला ऑटोइम्यून डिसऑर्डर असे देखील म्हटले जाते.

या आजाराचे निदान गुंतागुंतीचे असते.

चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button