Breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘वस्त्रकला’ मध्ये ‘पैठणी’ महोत्सवाचे आयोजन

पिंपरी चिंचवड शहरात महिलांसाठी प्रथमच पैठणी खरेदीची सुवर्ण संधी

पिंपरी | चिंचवड स्टेशन जवळील वस्त्र कला या महिलांसाठी सुसज्ज असे साडी दालन आहे. या साडी दालनात पैठणी, वेस्टर्न, पारंपरिक पद्धतीच्या विविध प्रकारच्या अनेक साड्या एकाच छताखाली मिळतात. वस्त्र कला मध्ये नुकताच पैठणी महोत्सवाचा शुभारंभ सारीकाताई सुनील (अण्णा) शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार उमा ताई खापरे, माजी महापौर मंगलताई कदम, माजी नगरसेविका सुलभा ताई उबाळे, अनुराधाताई गोरखे, कमलताई घोलप, शर्मिलाताई बाबर, नंदाताई ताकवणे, सुवर्णाताई भोईर, कविताताई मोरे, संचिता जगताप आदी उपस्थित होत्या.

हेही वाचा     –        अलर्ट..! HMPVव्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री! नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह 

पैठणी महोत्सवात येवला पैठणी, मुनिया पैठणी, गंधर्व पैठणी, बांगडी मोट पैठणी, बिशवबाही पैठणी, कस्तूरी पैठणी, बालगंधर्व पैठणी, महाराणी पैठण, कलांजली पैठणी, चंद्रकोर पैठणी, नथ बुटदा पैठणी, बाँकेर पैठणी, ऑलओव्हर पैठणी, बल्फ ऑल ओव्हर पैठणी, गडवाल पैठणी, मिनाकारी पैठणी, कलमकारी पैठणी, लोटस ब्रॉड काठ पैठणी आदी पैठणीचे प्रकार उपलब्ध आहेत. साड्यांचा उत्कृष्ट दर्जा, योग्य व माफक दर, चांगल्या सुविधा यामुळे ‘वस्त्र कला’ ने अल्पावधीतच महिलांच्या मनात आपुलकी निर्माण केली आहे. पैठणी महोत्सवाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group