Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

हिवाळ्यात वारंवार घसा दुखतोय? ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा..

Health Tips | राज्यामध्ये आता थंडीचा जोर वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्दी खोकल्यासारखे आजार अनेकांना होताना दिसत आहे. अनेक वेळा महागडे अँटीबायोटिक्स आणि कफ सिरप घेऊनही घसा खवखवण्यापासून आराम मिळत नाही. पण, घशातील संसर्ग, ताप आणि सर्दी-खोकला बरा करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत.

हळदीचे पाणी : हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे संक्रमण दूर करण्यास मदत करतात.

आलं आणि तुळस : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुळशी आणि आल्याचा चहा खूप फायदेशीर मानला जातो. आलं आणि तुळस या दोन्हीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात.

हेही वाचा    –    अभिनेता अल्लू अर्जुनच्या तेलंगणातील घरावर दगडफेक, आठ जण ताब्यात 

मध आणि दालचिनी : आयुर्वेदात दालचिनी आणि मध औषधी म्हणून वापरले गेले आहेत. घसादुखीपासून मुक्त होण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते.

काळी मिरी आणि मध : काळी मिरी आणि मध देखील घसादुखी आणि खोकल्यामध्ये खूप फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संक्रमण दूर करण्यात मदत करतात.

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही जर या घरगुती पदार्थांचा वापर केला तर तुम्हाला घसादुखीच्या खवखवण्यापासून आराम मिळेल. तसेच, या गोष्टींचा दुष्परिणामही होत नाही. पण त्रास वाढत राहिला तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button