Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘संत गाडगेबाबांचा व्यापक विचार आजही गरजेचा’; चंद्रकांत इंदलकर

महापालिकेच्या वतीने संत गाडगेबाबांना अभिवादन

पिंपरी : अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता निर्मुलनासाठी आपले आयुष्य व्यतीत करणारे संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी दृष्टीकोन असलेले थोर समाजसुधारक होते, त्यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोकशिक्षणाद्वारे स्वच्छतेचे व शिक्षणाचे महत्व लहानथोरांना पटवून दिले. त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा भावी पिढ्यांनी जोपासला पाहिजे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा –  ‘राम मंदिर निर्मिती झाली, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत

या कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य बन्सी पारडे, मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते नरेश कदम, सुनील अभंग, गजानन गवळी, विशाल जाधव, सुनील पवार, सतीश राऊत, किशोर रोकडे, राम शिंदे, संतोष गोतावळे, वैशाली राऊत, दयानंद अभंग, अशोक शिंदे, नाना सोनटक्के, बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button