Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थर्टी फर्स्ट, न्यू इयर सेलिब्रेटसाठी पवनानगरला येताय, तर पर्यायी मार्गांचा वापर करा

पवनानगर परिसरात कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल

पिंपरी :  पवनानगर परिसरात ३१ डिसेंबर आणि नववर्षारंभासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनामुळे वाहतूक कोंडी होऊ नये व कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ३० डिसेंबर मध्यरात्रीपासून ते ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

पुणे-मुंबई-कामशेत बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चारचाकी वाहने बंद करून ती येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे शिवली (कोथुर्णे बाजूकडे) कोथुर्णे-मळवंडी उजवीकडे ब्राम्हणोलीकडे फाट्यावरून पुढे सरळ, ब्राम्हणोली फाटा मार्गे जवण रोडवरून फांगणे, ठाकूरसाई, खडक गेव्हेंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग अशी वळविण्यात आली आहे. परंतु पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, पाले, घामनधरा, दुधिवरे बाजूस आणारी वाहने तसेच जड़ अवजड वाहने यांना सोडण्यात येईल.

वेळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली (कोथुर्णे बाजूकडे) कोथुर्णे गाव येथून डावीकडे, मळवंडी उजवीकडे फाट्यापासून ब्राम्हणोलीकडे-वारू फाट्यावरून पुढे सरळ ब्राम्हणोली एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.

मौजे ब्राम्हणोली, वारू, कोथुर्णे, शिवली येथील स्थनिक रहिवासी यांना येळसे बाजूकडे येण्यास बंदी करण्यात येत असून वारू फाटा ब्राम्हणोली फाटा-पवना नदी पूल, कालेगाव फाटा-पवना बाजारपेठ मार्गे वेळसे कामशेत या पर्यायी मागनि वळविण्यात येणार आहे.

हेही वाचा      –    संघ घोषाचा समग्र इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर येईल; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 

३० डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी२०२५ रोजी या कालावधीत पवनानगर बाजारात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक ही पवनानगर बाजारपेठ येथे जाण्यास बंदी करण्यात येत आहे.त्याऐवजी जुने विश्रामगृह पवनानगर मार्गे केदारी खानावळ चौकातून सरळ पुढे सात नंबर कॉलनी-पत्राचाळ सचिवालय ग्रामपंचायत इमारत अशी बाहावळणमार्गे वळविण्यात येत आहे. पंरतु, ब्राम्हनोली, कालेगाव, दुधीवरे बाजूकडून येणारी जड-अवजड वाहतूक पवनानगर बाजारातून येळसेकडे वळवली आहे.

१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीबारापासून तुंग, गौरवे, चावसर, जवन, खडक गेव्हडे, ठाकूरसाई, फांगणे बाजूकडून पवनानगर, कामशेत बाजूकडे जाणारी वाहने ही काले कॉलनी पवनानगरकडे आण्यास बंदी.

त्याऐवजी ब्राह्मणोली फाटा उजवीकडे-वारू फाटा सरळ मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरून डावीकडे कोथुर्णेगाव उजवीकडे- शिवली (येळसे बाजूकडे) येळसे ग्रामपंचायत फाटामार्गे मुंबई, पुणे, कामशेतकडे वळविण्यात येतील; परंतु पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, दुधीवरे बाजूस आणारी वाहने तसेच जड़-अवजड वाहने सोडण्यात येईल.

पवनानगर बाजारपेठ पर्यायी मार्ग

1.  चारू व ब्राह्मणोली येथील स्थानिक रहिवाशांना पढ़ना नदी पूल

2.  कालेफाटा-पवना बाजारपेठ असे येण्यास बंदी घालण्यात आली आहे. वास फाटा-मळवंडी, कोथुर्णे फाट्वावरून डावीकडे-कोथुर्णे गावातून पवनानगर बाजारपेठ या पर्यार्थी मागनि वाहतूक वळविण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.

3.  जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून ब्राह्मणोली फाट्यावरून उजवीकडे वारू फाटा सरळ-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरून डावीकडे कोथुर्णे गाव उजवीकडे-शिवली (वेळसे बाजूकडे) वेळसे ग्रामपंचायत फाटा, अशी एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button