पुनावळेची ट्वीन आर्क्स सी विंग सोसायटी होणार सौरऊर्जेत स्वयंपूर्ण!
अत्याधुनिक 34 kW रुफटॉप सोलर सिस्टीम कार्यन्वित

एक ते सव्वा लाख रुपयापर्यंतच्या वीज बिलाची बचत होणार
पिंपरी : सोसायटी सदस्यांना वीज, उर्जेची गरज लक्षात घेऊन पुनावळेतील ट्वीन आर्क्स सी विंग सोसायटीने सौर ऊर्जेमध्ये स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेतला आहे. या दृष्टीने 34 kW क्षमतेचे रूफटॉप सोलर बसवून ऊर्जा स्वयंपूर्णतेचे दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे सोसायटीचे परिसरात कौतुक देखील होत आहे. या उपक्रमामुळे वीज बिलामध्ये एक ते सव्वा लाख रुपयापर्यंतच्या वीज बिलाची बचत होणार आहे असे देखील सांगितले जात आहे.
हेही वाचा – संघ घोषाचा समग्र इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर येईल; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

पुनावळे येथील ट्विन आर्क्स सी-विंग सोसायटीने बसवीलेल्या “ सौर यंत्रणे “ सोसायटीचे समर्पित समिती सदस्य नवनाथ ढवळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आहे. सोसायटीने टाटा पॉवरकडून अत्याधुनिक 34 kW रुफटॉप सोलर सिस्टीम बसवून टिकाऊपणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सोलर इन्स्टॉलेशनमुळे दरमहा सुमारे 4 हजार युनिट वीज निर्माण होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे सोसायटीच्या ऊर्जेच्या 60 ते 70 टक्के ०गरजांची पूर्तता होईल. सुमारे 6 हजार युनिट्सचा सध्याचा मासिक वापर आणि 1.1 लाख ते 1.2 लाखांपर्यंतच्या वीज बिलांचा आर्थिक भार कमी करेल असे नवनाथ ढवळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाला अध्यक्ष सचिन भोसले, सचिव बालाजी पाटील, कोषाध्यक्ष ज्योत्स्ना रेड्डी, समिती सदस्य: रविशंकर जी, नीलेश रोकडे जी, पल्लवी गायकवाड जी, अथर्व रेवडीकर, सक्रिय सदस्य गुडी अंकल, सेतू प्रसाद , विनय टंडन आदी उपस्थित होते.





