अभिनेता अल्लू अर्जूनला हैदराबादमधून अटक; नेमकं कारण काय?

Allu Arjun | दक्षिणेकडील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली आहे. पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रीमियरवेळी हैदराबादमधील थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन याला अटक केली आहे.
हैदराबाद येथील आरटीसी चौकातल्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा-2’ चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. स्क्रिनिंगदरम्यान आलेल्या अल्लू अर्जुन आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुन याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘मंत्रिपदं जाहीर झाल्यानंतर अनेकांना धक्का बसेल’; संजय राऊत यांची टीका
संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुन याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कलम 105, 118(1) अन्वये गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.




