Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

Community Connect: ‘महायुती’मधील लिंगायत समाजाच्या आमदाराला ‘कॅबिनेट मंत्री’पदी संधी द्या!

लिंगायत समाज विकास प्रबोधन समितीचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांची मागणी

Share On

पुणे । प्रतिनिधी
लिंगायत समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासाला ताकद मिळावी यासाठी लिंगायत समाजातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या आणि महायुतीमध्ये निवडून आलेल्या कोणत्याही विधानसभा सदस्याला फडणवीस सरकारने कॅबिनेट मंत्री करावे, अशी मागणी लिंगायत समाज विकास प्रबोधन समितीचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्याच्या १५ कोटी लोकसंख्येपैकी लिंगायत समाजाची लोकसंख्या ही साधारणपणे १ कोअी २५ लाखांपेक्षा जास्त असून, एकूण लोकसंख्येचे प्रमाणात ९ टक्के हा लिंगायत समाज आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये लिंगायत समाजाचे लोक राहत असून, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात ही संख्या जास्त आहे.

लिंगायत समाज हा भाजपाच्या विचारसरणीला मानणारा समाज असून, गेलया महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजपाचे २० ते २५ आमदार केवळ लिंगायत समाजाच्या मतांवर निवडून आले आहेत. एकूण ४० विधानसभा मतदार संघामध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या निर्णायक आहे.

लिंगायत समाज हा व्यापारी समाज असून, राजकारणापासून दूर आहे. त्यामुळे आमच्या समाजाची संख्या जास्त असूनही केवळ निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असल्यामुळे समाजाचे केवळ ७ आमदार राज्याच्या विधीमंडळात आहेत, असेही सोमनाथ वैद्य यांनी म्हटले आहे.

लिंगायत समाजाचे हनुमंत हेरकाल, चंद्रकांत खोचरे, शिवलिंग ढवळेश्वर, बसवराज कनाजे, अशोक राजनशेट्टी, नागेश कुंभार, जयनाथ नागणसुरे, राजश्री हंचे, अमोल मसरे यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजनांच्या विकासाचे काम केले आहे. तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतली आहे. याबाबत लिंगायत समाजात आनंदाचे वातावरण आहे. समाज विकासातून राष्ट्र निर्मिती या संकल्पनेतून लिंगायत समाज आजवर राष्ट्रउभारणीसाठी काम करत आलेला आहे. त्यामुळे मित्र पक्षातील विनय कोरे यांना किंवा भाजपा पक्षातील निवडून आलेल्या कोणत्याही आमदारास १ कॅबिनेट मंत्री आणि २ राज्यमंत्री पदी नेमणूक करावी. त्याद्वारे लिंगायत समाजाला सामाजिक, आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी ताकद द्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
– सोमनाथ वैद्य, अध्यक्ष, लिंगायत समाज विकास प्रबोधन समिती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button