Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

Political News: विधानसभा मावळचे आमदार सुनील शेळके आज मंत्रीपदाची शपथ घेणार?

राजकारण: उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

पिंपरी-चिंचवड : मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली असून आज सोमवारी ते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी 2019 मध्ये इतिहास घडवला. तब्बल 25 वर्ष भाजपची सत्ता असलेला मावळ आपल्याकडे खेचून आणण्यात त्यांना यश मिळालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांना मावळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. त्यांनी यावेळी देखील विजय खेचून आणला. शेळकेंना एक लाखाचं मताधिक्य मिळालं आणि ते विजयी ठरले.

आमदारकीची दुसरी टर्म असलेल्या आमदार सुनील शेळके यांना मंत्रीपद मिळण्याच्या चर्चा सुरू होती. राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्री पदाच्या यादीत मावळच्या सुनील शेळकेंचं नाव आहे. आज त्यावर शिक्का मुहूर्त होणार असून मंत्रीपदाची शपथ सुनील शेळके घेणार आहेत. त्यांना कोणत्या विभागाची जबाबदारी देण्यात येईल याबाबतची उत्सुकता मोठ्या प्रमाणात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group