Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांना मोठा दिलासा

Ajit Pawar :  राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होताच मोठ्या घडामोडी होताना दिसून येत आहेत. कारण   महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने अजित पवारांची  जप्त केलेली संपत्ती रिलीज केली असून दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश जारी केले असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कालच शपथ घेतली. त्यावेळी, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे, अजित पवारांनी कालच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांची संपत्ती मुक्त करण्यात आल्याचा निकाला बेनामी ट्रिब्युनलने दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, राजकीय वर्तुळाताही याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा –  ज्येष्ठांना मंत्रीपदाचे वेध; महायुतीत बहुसंख्य अनुभवी आमदार असल्याने वरिष्ठांपुढे निवडीचा तिढा

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची संपत्ति इनकम टॅक्स विभागाने सीज केली होती. आता, न्यायालयाच्या आदेशानुसार ती संपत्ती मुक्त करण्यात आली असून लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली जाईल. दरम्यान, 7 ऑक्टोबर 2021 मध्ये अजित पवारांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाकडून छापा टाकून संपत्ती जप्त करण्यात आली होती.

आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांशीृ संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त केली होती. त्यामध्ये, एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा केलेला नाही, असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर, दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाचे अपील फेटाळले आहे. तसेच, अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button