सहशहर अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/pcmc-02.jpg)
विधी समितीसमोर मान्यतेसाठी प्रस्ताव
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना सहशहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात येणार आहे. याविषयी विधी समितीपुढे येत्या शुक्रवारी (दि.19) मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवला आहे. विधी सभेच्या मान्यतेनंतर महासभेकडे शिक्कामोर्तब होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सह शहर अभियंत्याची तीन पदे मंजूर आहेत. स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील आणि विद्युत विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे अशी दोन पदे भरलेली आहेत. तर, एक पद रिक्त होते. रिक्त पद भरण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती समितीची 4 सप्टेंबर 2018 रोजी बैठक झाली. या बैठकीत निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी विधी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. विधीच्या मान्यतेनंतर महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.