Uncategorized

सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न

आरोपी खलिस्तान समर्थक असल्याचा संशय

अमृतसर : अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला रोखलं व त्याला ताब्यात घेतलं. नारायण सिंह असं आरोपीचं नाव आहे. सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यासाठी ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले होते. यावेळी अचानक एक व्यक्ती आला व त्याने सुखबीर सिंग बादल यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडलं. आरोपी खालसाशी संबंधित असल्याचा संशय आहे.

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. गळ्यात फलक आणि हातात भाला घेऊन ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले होते. यावेळी हल्ल्याचा प्रयत्न झाला. 2 डिसेंबरला श्री अकाल तख्त साहीबने त्यांना ही शिक्षा दिली आहे. 2007 ते 2017 दरम्यान पंजाबमध्ये सत्तेवर असताना त्यांच्या पक्षाने आणि सरकारने केलेल्या चुकीबद्दल श्री अकाल तख्त साहीबने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.

नारायण सिंहने सुखबीर बादल यांच्यासमोर जाऊन बंदूक बाहेर काढली. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले त्याला रोखण्यासाठी त्याच्या दिशेने पळाले. रोखल्यामुळे नारायण सिंहने हवेत गोळीबार केला.

हल्ला का केला?
आरोपी खलिस्तान समर्थक असल्याचा संशय आहे. बेअदबी प्रकरणामुळे तो सुखबीर बादल यांच्यावर नाराज असल्याच बोललं जातय. शीख धर्मगुरुंकडून धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर सुखबीर सिंग बादल यांनी काल सेवादार म्हणून सेवा दिली. आज त्यांच्या ‘तनखाह’ म्हणजे शिक्षेचा दुसरा दिवस होता. काल बादल यांनी निळ्या रंगाचा सेवादारचा पोषाख परिधान केला होता. हातात भाला घेऊन व्हीलचेअरवर बसून ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर तैनात होते. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने ते व्हीलचेयरवर बसले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button