पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी
केएल राहुल-यशस्वी जयस्वाल हि ऑस्ट्रेलियात द्विशतकी खेळी करणारी पहिली भारतीय सलामी जोडी ठरली

पर्थ : पर्थ येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. गोलंदाजांनी पहिल्या डावात तारल्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल जोडीने पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी केली. या मोठ्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियात द्विशतकी खेळी करणारी पहिली भारतीय सलामी जोडी ठरली आहे.
यापूर्वी ऑस्ट्रेलियात सलामी जोडी म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर आणि ख्रिस श्रीकांतच्या नावावर होता. 1986 मध्ये 38 वर्षानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने हा विक्रम मोडीत काढला आहे. तसेट ऑस्ट्रेलियात पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करणारी सलामीची जोडी ठरली आहे.
केएल राहुल 77 धावांवर असताना मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. तेव्हा यशस्वी जयस्वाल हा 102 धावांवर खेळत होता. तर 22 या अतिरिक्त धावा आल्या होत्या. भारताने तिसऱ्या दिवशी 500 धावांचा पल्ला गाठला आहे.




