‘युगेंद्र पवार विजयी होतील’; श्रीनिवास पवार यांना विश्वास

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. त्यामुळे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर बारामतीत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत, त्यामुळे बारामतीची लढत चर्चेत आहे. दरम्यान, श्रीनिवास पवार यांनी युगेंद्र पवार विजयी होतील याचा १०० टक्के विश्वास आहे, असं म्हटलं आहे.
श्रीनिवास पवार म्हणाले, की १०० टक्के युगेंद्र जिंकेल मला विश्वास आहे. शहर आणि ग्रामीण दोन्हीकडून आम्हाला मतं मिळतील. बारामतीचा मतदार सूज्ञ आहे. आत्मविश्वास कुणाला कितीही असूद्या. युगेंद्र विजयी होईल मला विश्वास आहे. मी लाखाच्या गोष्टी करणार नाही पण विजय हा विजय असतो. युगेंद्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होता त्यामुळे तो लोकांना भेटला. अजित दादा तीस वर्षांपासून राजकारणात आहेत त्यामुळे ते लोकांना भेटले नसतील.
हेही वाचा – ‘महाराष्ट्रात यावेळीही महायुती सत्तेत येईल’; उदयनराजे भोसले
शरद पवारांशी आमची फोनवरुन चर्चा झाली. त्यांनी काही सूचना दिल्या आहेत पण त्या मी सांगणार नाही. बारामती शरद पवारांचीच आहे लक्षात ठेवा. आमची लढाई विचारांची आहे. अजित पवारांना काही आम्ही फार मोठं समजत नाही. अजित पवार किंगमेकर वगैरे काहीही होणार नाहीत. नवाब मलिक किती राजकीय तज्ज्ञ आहेत मला माहीत नाही. बारामतीचा मतदार बोलत नाही तो करुन दाखवतो, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.





