ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अमृता खानविलकरकडे 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती

'खतरों के खिलाडी' शोसाठी अमृताचं मानधन प्रति एपिसोड 1.5 लाख रुपये

मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर फक्त अभिनयातूनच नाही तर, दमदार नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावर देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

अमृताने फक्त सिनेमांमध्ये नाही तर, रिऍलिटी शोमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिॲलिटी शो फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10 आणि झलक दिखला जा 10 या डान्स शोमध्ये अमृता मोठ्या झळकली होती. ज्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली.

रिपोर्टनुसार, ‘खतरों के खिलाडी’ शोसाठी अमृताचं मानधन प्रति एपिसोड 1.5 लाख रुपये होती. तर ‘झलक दिखला जा 10’ शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिनेत्रीला 10 लाख रुपये मिळाले होते. अशी माहिती देखील समोर आली. अमृता खानविलकरच्या मनधनाबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, अभिनेत्री एका सिनेमासाठी 10 ते 12 कोटी रुपये घेते. अभिनेत्रीकडे 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मुंबईत आलिशान घर देखील घेतलं आहे. घराचे फोटो अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अमृता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अमृता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button