पिंपरीत आमदार बनसोडेंच्या विजयासाठी रणरागिणी मैदानात!
मिशन विधानसभा : प्रियाताई बनसोडे यांचा मतदार संघात झंझावाती प्रचार

पिंपरी | शाहूनगर संभाजी नगर येथे आधार महिला मंडळ यांनी ‘महिलांचा स्नेहमेळावा व स्नेहभोजन’ आयोजित केले होते. यावेळी आमदार आण्णा बनसोडे यांच्या सुविद्यपत्नी प्रियाताई बनसोडे आणि आमचे सहकारी मार्गदर्शक यांनी महिलांशी संवाद साधून महायुतीला बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला.
यावेळी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, नगरसेविका सुजाता पालांडे, सुप्रिया चांदगुडे आणि महिला तसेच महायुतीच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला दिला.
पिंपरी-चिंचवड महिला भजनी महासंघच्या शहरातील 40 महिला भजनी मंडळांनी बनसोडे यांना जाहीर पाठींबा दिला असून, येत्या 20 तारखेला पिंपरीच्या सर्वांगीण कल्याणासाठी अण्णा बनसोडे यांना निवडून देण्याचा निर्धार केला आहे.
हेही वाचा – मिशन विधानसभा : इस्लामपूर मतदारसंघात ऊस दर, व बीलाचीच चर्चा!

सुदर्शन नगर- गावडे कॅालनी-श्रीधरनगर-लिंकरोड : प्रचार दौरा
आज माझ्या प्रचारार्थ आमदार उमा खापरे, मा. महापौर अपर्णा डोके, मा. नगरसेविका जयश्री गावडे, शैलेश मोरे, शितल शिंदे यांच्यासोबत प्रचार दौरा पार पडला. यावेळी समाजातील सर्व घटकांसाठी महायुती भरीव योगदान देत असल्याचे सांगून येत्या 20 तारखेला पिंपरीच्या सर्वांगीण कल्याणासाठी सहकार्य करा, असे आवाहन करण्यात आले.
लालबहादूर शास्त्री भाजी मंडईचा पाठिंबा…
विधानसभा निवडणूक २०२४ची शेवटच्या टप्प्याची रणधुमाळी सध्या सुरु आहे.लालबहादूर शास्त्री भाजी मंडईच्या पाठीशी कायम आणि ठामपणे उभा असलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी, म्हणून लालबहादूर शास्त्री भाजी मंडईतर्फे जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठींब्याबद्दल लालबहादूर शास्त्री भाजी मंडईच्या बांधवांचे आमदार आण्णा बनसोडे यांनी आभार मानले. यावेळी माजी महापौर योगेश बहल, मा. नगरसेवक रंगनाथ शेठ कुदळे, अध्यक्ष भारत जगताप, उपाध्यक्ष सोमनाथ थिटे उपस्थित होते.





