Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

इतिहासाची पुनरावृत्ती होणार..! लातूर शहराला नवा आमदार मिळणार?

लातूर | लातूरच्या राजकीय रणधुमाळीत यंदा लातूर शहर मतदारसंघातून भाजपने अर्चना पाटील चाकूरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. अर्चना पाटील चाकूरकर या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याशी लढणाऱ्या काँग्रेस घराण्यातीलच दुसऱ्या हाय प्रोफाईल सून ठरल्या आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्यासोबत आहे. सुरुवातीपासून या मतदारसंघावर काँग्रेसनं एक हाती वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजपनेही चांगलीच तयारी केलीय. अशातच आता अर्चना पाटील चाकूरकर इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी लातूरच्या राजकारणात उतरल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही उमेदवारात मोठी लढत बघायला मिळणार आहे. याआधी देखील लातूरमध्ये भाजपच्या पहिल्या खासदार रूपा पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर यांचा सरळ लढतीत पराभव केला होता. त्यावेळी देखील अशीच परिस्थिती मतदारसंघात निर्माण झाली होती. मात्र अशावेळी चाकूरकर यांचा पराभव केला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती मतदारसंघात होणार का? त्याची चर्चा सुरू झाली आहे.

कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्या भाजपकडून सुरूंग लावण्याचा प्रयत्न

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यांचा सामना आता काँग्रेसचे तीन वेळा आमदार राहिलेले अमित देशमुख यांच्या सोबत होणार आहे. लातूर शहर मतदार संघावर विलासराव देशमुख पासून ते अमित देशमुख पर्यंत काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. मात्र काँग्रेसच्या या बालेकिल्ला यंदा भाजपकडून सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठीच त्यांनी काँग्रेसच्या अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे चाकूरकर देखील लातूरच्या राजकारणातील इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

हेही वाचा     –        दादा कोथरुड मधून तू दणक्यात निवडून येणार! 

रूपा पाटील निलंगेकरांनी मारली होती बाजी

सुरुवातीपासून लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. याच बालेकिल्ला सुरूंग लावण्याचं काम भाजपने 2004 साली केला होता. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ‘शिवाजीराव पाटील निलंगेकर’ यांची सून ‘रूपा पाटील निलंगेकर’ यांना मैदानात उतरवलं होतं. त्यावेळी रूपा पाटील निलंगेकर यांनी माजी मंत्री राहिलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचा सरळ लढतीत पराभव केला होता. अनेक वर्षापासून लातूरच्या राजकारणावर काँग्रेसची पकड होती. मात्र त्याच वेळी रूपा पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला उध्वस्त करण्याचा काम केलं होतं. आता पुन्हा जवळपास पंधरा वर्षांपासून लातूर शहर मतदार संघावर काँग्रेसचं एक हाती वर्चस्व राहिलाय. याच वर्चस्वाला धक्का लावण्यासाठी भाजपनं अर्चना पाटील चाकूरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

लातुर शहर मतदारसंघात जातीय समीकरण

लातूर शहर मतदार संघाचं जातीय समीकरण बघायचं झाल्यास याच मतदारसंघात मराठा आणि लिंगायत मतदार सुमारे 26 टक्के आणि 25% आहे. ज्यात दलित आणि मुस्लिम 23% आणि 29 टक्के आहेत. अमित अमित देशमुख हे केवळ आपली जागा टिकून ठेवत नाहीत तर मराठा बहुल मराठवाड्यात काँग्रेसचा चेहरा म्हणून उदयास येत आहेत. त्यामुळे अमित देशमुखांना मोठं होणं पक्षातीलच अनेकांना रूचणार नाहीय.

विजयी होण्याचा अर्चना पाटील चाकुरकरांना विश्वास

दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील चाकूरकर यांना स्थानिक मतदारसंघात देशमुख कुटुंबाबाबतची नाराजी आणि लिंगायत मतांचा फायदा होण्याची आशा आहे. त्यामुळे अर्चना पाटील चाककर यांना विजयाचा विश्वास वाटत आहे. यातच गेल्या पंधरा वर्षात काँग्रेसच्या आमदारानं कोणताही विकास केला नसल्याची नाराजी देखील मतदारसंघात दिसून येत आहे. त्यामुळे अर्चना पाटील चाकूरकर यांच्या रूपाने लातूर शहरात भाजपला नवा आमदार मिळणार का ? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button