Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point : गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय केले? आमदार आण्णा बनसोडे यांनी यादीच जाहीर केली! 

मिशन विधानसभा : पिंपरीत महाविकास आघाडीचा ‘‘सेल्फ गोल’’

डॉ. शिलवंत यांच्या खांद्यावर बंदूक अन्‌ आमदार बनसोडे ‘टार्गेट’


पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत-धर अशी थेट लढत आहे. आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. अगदी त्यांच्या शपथविधी वेळी देखील अण्णा बनसोडे हे अजित पवारांसोबत होते. त्यामुळे ही लढत लक्षवेधी होणार आहे.

दरम्यान, आमदार बनसोडे यांच्या विरोधात ‘फेक नॅरेटिव्हव्ह’ करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावर महाविकास आघाडीचा उल्लेख नाही. त्यामुळे डॉ. शिलवंत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अन्य राजकीय महत्त्वाकांक्षी नेत्यांकडून आमदार बनसोडे यांना  ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार आण्णा बनसोडे यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा पिंपरी विधानसभेत विजय मिळवला. २०१४ ला त्यांचा पराभव झाला. तर २०१९ ला पुन्हा ते पिंपरी विधानसभेतून विजयी झाले. चौथ्यांदा पिंपरी विधानसभा लढवत असून, त्यांच्यासमोर शरद पवार गटाच्या नेत्या सुलक्षणा शीलवंत- धर यांचे आव्हान आहे. ग्राउंडचा विचार केला, तर आण्णा बनसोडे घराघरात पोहोचले आहे. गोरगरिब नागरिकांमध्ये बनसोडे यांच्याप्रती सकारात्मक वातावरण असून, ‘‘पिंपरीत आण्णा पुन्हा’’ अशी चर्चा जोर धरु लागली आहे. 

मात्र, आमदार आण्णा बनसोडे विरोधकांनी ठिकठिकाणी फलक लावले आणि प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय केले ? एमआयडीसी बळकट करण्यासाठी तुम्ही काय केलं? ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केलं? कोविड काळात नागरिकांसाठी तुम्ही काय केलं? पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तुम्ही काय केलं? असा प्रश्न बनसोडे यांना उपस्थित केला. त्यामुळे काय केले? सांगण्याची सुवर्णसंधी विरोधकांनी उपलब्ध करुन दिली. त्या संधीचे सोने करीत बनसोडे यांनी वास्तवदर्शी उत्तर दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह राजकीय विरोधकांचा ‘सेल्फ गोल’ झाला आहे. 

आमदार आण्णा बनसोडे यांनी काय केले? सवाल अन्‌ जवाब…! 

  1. सवाल : गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय केले ?
    जवाब : स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण झाले. शहरात सीसीटीव्ही कमांड सेंटरच्या माध्यमातून ‘थर्ड आय’ कार्यान्वयीत होणार आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे विभाजन करुन दापोडी आणि संत तुकारामनगर असे २ पोलीस ठाणे नवीन निर्माण झाले.
  2. सवाल : एमआयडीसी बळकट करण्यासाठी तुम्ही काय केलं?
    जवाब : एमआयडीसी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून विकसित होत आहेत. औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सोयी-सुविधा सक्षम केल्या. त्यामुळे आयटी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दोन डाटा सेंटर पिंपरी आणि मोरवाडी येथे उभारली जात आहेत.
  3. सवाल :  ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केलं?
    जवाब : सुलभ आणि जलद प्रवासी सुविधा मिळावी. या करिता महायुती सरकारने स्वारगेट ते पिंपरी आणि आता पिंपरी ते निगडी अशी मेट्रो विकसित होते आहे. डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम हाती घेण्यात आले. भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूलाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. अंतर्गत रस्त्यांची कामेही मार्गी लावली आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सातत्त्याने पुढाकार घेतला.
  4. सवाल : कोविड काळात नागरिकांसाठी तुम्ही काय केलं?
    जवाब : ऑक्सिजन बेडपासून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्कारापर्यंत सर्वोतोपरी पुढाकार घेणारा आमदार म्हणून आमदार आण्णा बनसोडे यांची ओळख आहे. कम्युनिटी किचन, कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, आमदार बनसोडे यांच्या कार्यकाळात शहरात सहा नवीन विभागीय रुग्णालये कार्यान्वयीत झाली आहेत.
  5. सवाल : पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तुम्ही काय केलं?
    जवाब : पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या दुसऱ्या टोकावर म्हणजेच दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी या भागात पाणी पुरवठ्याची मोठी समस्या होती. त्यामुळे निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाईपने पाणी दापोडी भागातील जलकुंभामध्ये आणण्याचा प्रकल्प प्रस्तावित होता. त्याला मान्यता मिळाली आणि काम प्रगतीपथावर आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी समस्या कमी होणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button