Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्वारगेट डेपो येथे पीएमपीएमएल बसला आग

पुणे : आज दि. ०९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी स्वारगेट बस डेपो वर्कशॉप येथील आवारात पीएमपीएमएल बसने पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी अग्निशमन दलाला वर्दी प्राप्त होताच ते घटना स्थळी रवाना झाले.

याप्रसंगी अग्निशमन दलाच्या माहितीनुसार बसच्या पुढच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. जवानांनी लगेच चारही बाजूने पाण्याचा मारा करीत सुमारे दहा मिनिटात आग पुर्ण विझवत पुढील धोका दूर केला. सदर आगीमध्ये बसचे बरेच नुकसान झाले असून आगीचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी नाही.

हेही वाचा –  पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २४ जण मृत्यूमुखी

तसेच या घटनेवेळी पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांकडून प्रसंगावधान राखत अग्निशमन दलाकडून विविध ठिकाणी देण्यात येणारी व्याख्याने व प्रात्यक्षिके याचा मोठा फायदा तर झालाच पण आगीविषयक सुरक्षा व उपाययोजना याचे प्रशिक्षण घेतल्यामुळे आज अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) वापरुन प्राथमिक स्वरुपात आगीवर नियंञण मिळवता आले अशी भावना व्यक्त करीत अग्निशमन दलाचे आभार मानले.

या कामगिरीत प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर, वाहनचालक अतुल मोहिते व फायरमन चंद्रकांत गावडे, आजीम शेख, सागर ठोंबरे, मयुर ठुबे, तुषार जानकर यांनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button