‘विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार’; ICU मधून प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Prakash Ambedkar | विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही शस्त्रक्रिया पार पडल्या. यानंतर त्यांची आता प्रकृती स्थीर असून त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणावर गंभीर भाष्य केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, की मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे. यंदाची ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे.
हेही वाचा – माहीममध्ये महायुतीचा निर्णय काय? अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..
आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा. दुसऱ्या बाजूला एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.





