Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘अर्थसंकल्पातील एम्सबाबतच्या घोषणेचे स्वागत’; आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पुणे हे आरोग्यसुविधांबाबत मोठे हब होऊ पाहात आहे; परंतु सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने मिळावी, यासाठी खडकी, औंध या भागात रुग्णालय, अधिक बेड, तसेच एम्सच्या धर्तीवर रुग्णालय हा अजेंडा होता. त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले.

राज्य सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेचे स्वागत असून, त्यामुळे ससून रुग्णालयावरील भार हलका होईल, असा यामागचा उद्देश्य असल्याचे शिरोळे म्हणाले. याशिवाय औंधमध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची गरजही पूर्ण होईल, असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला.

खडकीसाठी विशेष निधी मिळावा, या दृष्टीनेही सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे. महापालिकेच्या दळवी रुग्णालयातही माता आणि बालकांसाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यातही महत्त्वाचा वाटा आहे. यामुळे मुळारोड, पीएमसी कॉलनी, पाटील इस्टेट वसाहत, नरवीर तानाजीवाडी, भैय्यावाडी, छत्रपती शिवाजीनगर, गोखलेनगर या ठिकाणच्या गर्भवती महिला भगिनींना त्याचा उपयोग झाला आहे.

हेही वाचा   –      ‘वाढत्या प्रदुषणामुळे मी मॉर्निंग वॉक बंद केला’; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचं वक्तव्य 

काही संस्थांच्या सहकार्याने मतदारसंघात मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन केले होते. रक्त, हिमोग्लोबिन या तपासण्या तर नेहमीच होत असतात; परंतु त्याशिवाय अगदी वेगळ्या तपासण्याही करून घेतल्या आहेत. कर्करोग, हृदयरोग, हर्निया, आहार तज्ज्ञांचा सल्ला, फिजिओथेरपी सल्ला, नेत्रतपासणी, मुतखडा, मूळव्याध, स्त्रीरोग,ॲपेंडिक्स याच्या तपासणीसह मोफत डायलिसिस करण्यात आले.

व्यसनाधीनतेचे प्रमाण समाजात खूप वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्ती केंद्राची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केल्याचे शिरोळे यांनी सांगितले. येरवडा मनोरुग्णालयाच्या आवारात व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही केली होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला, त्याला मंजुरी मिळाली आणि हे ३५ बेडचे केंद्र सुरूही झाले. त्याला निधीही मिळाला. व्यसनमुक्तीसाठी विविध ठिकाणी केंद्रे उभारायला हवीत आणि व्यसनाधीन तरुणांना व्यसनमुक्तीची संधी द्यायला हवी, असे मत सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा, यासाठी भरीव निधीची तरतुदीची मागणी केली. याशिवाय शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अनेक सेवा वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये मी सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियान सुरू केले आणि ते यशस्वी केले, असेही त्यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button