Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Breaking News | भोसरीत गजबजलेल्या आळंदी रोडवरील पेट्रोल पंपावर कारला भीषण आग

कार जळून खाक : सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, जीवितहानी नाही

पिंपरी-चिंचवड | भोसरी-अळंदी रस्त्यावरील टिंगरे पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. कार पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी उभी असताना हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आले. सुदैवाने, पेट्रोल पंपाच्या अगदी जवळच ही आग लागली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली व काही वेळातच आग आटोक्यात आणली.

हेही वाचा    –    ‘निवडणुकीनंतर परत टोल सुरु करण्याचा प्रयत्न झाल्यास..’; राज ठाकरेंचा इशारा 

कारमधील प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे भोसरी-अळंदी रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे, आणि आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेण्यात येत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button