Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘कुठेही निवडणुका घ्या भाजपा आणि मोदी हरणारच’; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे तिथे मागेपुढे गोष्टी होत राहणार. नायब सैनी म्हणाले ती बंदोबस्त करू. मात्र हरियाणात भाजपाविरोधी लाट आहे, ही लाट मोदी आणि शाह यांच्या विरोधात आहे. तिथली जनता भाजपाला निवडून देणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, हरियाणात काँग्रेसचं सरकार येईल, जम्मू काश्मीर काँग्रेस अलायन्सचं सरकार येईल, असंही ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, कुठेही निवडणूक घ्या मोदी, अमित शाह आणि भाजपा हा पक्ष हरणार. उत्तर प्रदेशात निवडणूक घ्या, गुजरातमध्ये घ्या भाजपा हरणार. मोदींचा मुखवटा, मेक अप आता उतरला आहे. हरियाणाबरोबर महाराष्ट्राची निवडणूक घेतली असती तर महाराष्ट्रातही भाजपाचा पराभव झाला असता. महाराष्ट्रात १७५ ते १८० जागा महाविकास आघाडीला मिळतील.

हेही वाचा    –      ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला 

निवडणूक आयोग म्हणजे काय? ती भाजपाचीच वेबसाईट आहे त्यांनी काहीही दाखवू द्या. काही वेळात सगळं चित्र स्पष्ट होईल. पूर्ण निकाल लागत राहतील, मला खात्री आहे हरियाणाची जनता ही लढवय्या आहे. महाराष्ट्रातील जनतेप्रमाणेच ती जनता आहे. महाराष्ट्रातल्या जागावाटपाची चिंता करू नका. आम्ही व्यवस्थित जागावाटप करू, दसऱ्यापर्यंत आमचं जागावाटप होईल. भाजपाचा महाराष्ट्रातही पराभव होईल. जागावाटप लवकरच जाहीर होईल, असंही संजय राऊत म्हणाले.

हरियाणात काय निकाल लागतो त्याचा परिणाम काही महाराष्ट्रातल्या जागावाटपावर होणार नाही. काँग्रेसकडे चेहरा असेल तर त्यांनी जाहीर करावा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, पाठिंबा देतो असंही म्हणाले होते. चेहरा जाहीर केला पाहिजे ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका आहे त्यात काही चुकीचं नाही. मुख्यमत्रिपदाची चर्चा दिल्लीत होते, तिथे त्यांची एक यंत्रणा आहे. आम्ही आमच्या पक्षांबाबत सांगू शकतो, आम्ही आमचा निर्णय घेऊ शकतो. काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होतात कारण त्यांचं हायकमांड दिल्लीत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button