‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

Suraj Chavan and Abhijit Sawant | ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन नुकताच संपुष्टात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने या सिझनचं विजेतेपद पटकावलं आहे. तर गायक अभिजीत सावंत हा उपविजेता झाला. सध्या दोघांवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशातच सूरज आणि अभिजीतने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर सूरज आणि अभिजीतने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी सूरजने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी बाप्पाच्या चरणी ठेवली. “गणपती बाप्पा मोरया”, “जय श्रीराम” असा जयघोष करताना सूरज दिसला. याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा – ‘महाराष्ट्रातील जनता लवकरच हिशेब करणार’; प्रियांका गांधींची महायुतीवर टीका

दरम्यान, सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसह १४.६ लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे. सूरज या पैशांचा वापर घर बांधण्यासाठी करणार आहे, असं त्याने माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.





