ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तिरंदाजी स्पर्धेत पिंपरी चिंचवडचे घवघवीत यश

पिंपरी चिंचवड मधील तिरंदाज  ३ पदकांचे मानकरी

पिंपरी : तैवान येथे नुकत्याच पार पडलेल्या युवा अशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताने ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्यपदक प्राप्त करून दुसरा क्रमांक पटकावला. या  १९ पदकांपैकी ९ पदके एकट्या महाराष्ट्रामधील तिरंदाजांनी मिळवली असून यामधील ३ पदकांचे मानकरी हे पिंपरी चिंचवड मधील तिरंदाज ठरले आहेत.

तैवान येथे २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली . पिंपरी चिंचवडच्या प्रिथिका प्रदीप हिने पदार्पणातच दमदार कामगिरी करत ‘कंपाऊंड’ या प्रकारात यजमान देशांच्या अव्वल  तिरंदाजाला हरवून वैयक्तिक फेरी मध्ये सुवर्णपदक मिळवून पिंपरी चिंचवडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णाक्षरात कोरले . तसेच प्रिथिका हिने सांघिक फेरीमध्ये रौप्यपदक प्राप्त करून एकूण २ पदके  मिळविली. तसेच शर्वरी शेंडे हिने ‘रिकर्व्ह’ या प्रकारात वैयक्तिक फेरीमध्ये बलाढ्य मानल्या जाणाऱ्या कोरीयाच्या तिरंदाजांना उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीमध्ये पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळविला.
अंतिम फेरीमध्ये उत्तम लढत देत शर्वरी हिने रौप्यपदक प्राप्त केले.

तैवान येथील स्पर्धेमध्ये वादळ आणि पाऊस अशी प्रतिकुल परिस्थिती निर्माण होऊनही महाराष्ट्रातील सर्व तिरंदाजांनी उत्तम कामगिरी करून पदके मिळवल्यामुळे त्यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. प्रिथिका आणि शर्वरी या दोघी  पिंपरी चिंचवड येथील स्वराज्य आर्चरी अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक कुणाल तावरे यांच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षण घेत आहेत .

भारतीय तिरंदाजी ही गेल्या काही दिवसापासून मजबूत झाली आहे. जूनियर आणि सब-जूनियर  आर्चर्स सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगले प्रदर्शन करीत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पालक आणि खेळाडू यांना खेळाचे महत्त्व समजले असून याचमुळे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय  स्तरावर स्पर्धकांची संख्या वाढलेली आहे. जूनियर व सब-जूनियर खेळाडू हे भविष्यात येणाऱ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधे नक्कीच चांगले प्रदर्शन करतील.

कुणाल तावरे,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group