Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे-भोपाळदरम्यान आता विमानसेवा

पुणे :  पुणे आणि भोपाळ मार्गावर इंडिगो कंपनीने नव्याने विमानसेवा सुरू केली आहे. यामुळे पर्यटनासह या दोन शहरांमधील महत्त्वाच्या व्यापार व्यवसायाला देखील प्रोत्साहन मिळणार आहे.

दि. २७ आॅक्टोबरपासून दररोज या मार्गावर उड्डाण सुरू होणार असून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच पुणे-इंदौर, पुणे-चेन्नई आणि पुणे-रायपूर या मार्गांवर देखील इंडिगो दिवाळीच्या आधीच म्हणजे २७ आॅक्टोबरपासून आपल्या उड्डाणांची संख्या देखील वाढवणार आहे, असे इंडिगोचे प्रमुख विनय मल्होत्रा यांनी सांगितले.

हेही वाचा –  साताऱ्यात मविआचे चार उमेदवार निश्चित?

असे असेल उड्डाणांचे वेळापत्रक

६ए-२५८ हे पुणे-भोपाळ विमान २७ आॅक्टोबरपासून दररोज दुपारी १ वाजता उड्डाण करेल आणि २ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. ६ए-२५७ हे भोपाळ-पुणे विमान दुपारी ३ वाजून ०५ मिनिटांनी उड्डाण करेल आणि ४ वाजून ५० मिनिटांनी पोहचेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button