पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना, पॉर्न व्हिडीओ दाखवत ५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
![A 5-year-old boy was sexually assaulted by showing a porn video](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Pune-Crime-2-780x470.jpg)
पुणे | पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. कोंढवा परिसरात ५ वर्षाच्या मुलावर ३ अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पॉर्न व्हिडीओ दाखवत मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात ३ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिढीत मुलगा सोसायटीमध्ये खेळत असताना तिघांनी मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ दाखवत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलाच्या मोठ्या भावासमोर हे अनैसर्गिक कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तिन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.